Posts

संसारे कुलस्वामी श्री टोळभैरव मंदिरात देव दिवाळी उत्सव साजरा

Image
  श्री टोळभैरव देवस्थान सुतारवाडी कसबा संगमेश्वर येथे दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी देव दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी दहा वाजता गणेश पूजन व श्री टोळभैरव यांच्या मूर्तीवर अभिषेक, शोडषोपचार पूजा करण्यात आली. पूजा आणि अभिषेक श्री ओंकार स्वामी जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिकेत आणि सौ अमृता संसारे जयगड यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी दीड वाजता श्री देव टोळभैरव यांना नैवेद्य दाखवण्यात आला आणि महाआरती करण्यात आली यावेळी नागेश्वर भजनी मंडळ कुंभारवाडी यांनी सुश्राव्य भजन सादर केले. विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी मंदिर सजवण्यात आले होते सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराची उत्तम प्रकारे रंगरंगोटी करण्यात आली होती. मंदिर परिसर वर मंदिराकडे येणाऱ्या मार्गाची साफसफाई करण्यात आली होती व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गामध्ये फलक लावून नवीन येणाऱ्या भक्तांची सोय करण्यात आली होती. यावर्षीचा महाप्रसाद सौ पद्मा प्रमोद संसारे चिपळूण यांनी श्री चरणी अर्पण केला होता त्याचे सर्व भक्तांना वाटप करण्यात आले. संगमेश्वर चिपळूण रत्नागिरी शृंगारतळी राजापूर मुंबई ...

संसारे कुलस्वामी श्री टोळभैरव

Image
 श्री टोळभैरव देवस्थान सुतारवाडी संगमेश्वर हे संसारे कुटुंबीयांचे कुलदैवत असून त्यांचे मूळ मंदिर श्री तुळजापूर येथे आहे. प्राचीन काळापासून संगमेश्वर जवळील सुतारवाडी कसबा येथे श्री टोळभैरव यांचे मंदिर घुमटीच्या स्वरूपात अस्तित्वात होते. संगमेश्वर आणि जवळपासच्या गावातील संसारे कुटुंबीयांनी एकत्रित येऊन त्याचा जीर्णोद्धार केला आणि नव्या स्वरूपातील सुंदर मंदिर उभारले.      या मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दिवाळी या दिवशी श्री देव टोळ भैरव यांचा उत्सव साजरा केला जातो त्या दिवशी शोडशोपचारे पूजा, अभिषेक ,होम हवन, भजन, कीर्तन ,महाप्रसाद इत्यादी द्वारे साजरा केला जातो यावेळी मुंबई रत्नागिरी चिपळूण राजापूर कोल्हापूर संगमेश्वर या ठिकाणी असलेले संसारे कुटुंबीय आवर्जून उपस्थित राहतात. श्री टोळभैरव  देवस्थान पासून जवळच श्री कुंभकेश्वर श्री कर्णेश्वर श्री काळभैरव व इतरही अनेक पुरातन मंदिरे आहेत. श्री संभाजी महाराज यांचे स्मारक सुद्धा पाहण्यासारखे आहे. मंदिरात येण्यासाठी जवळचे बस स्थानक संगमेश्वर बस स्थानक असून तेथून कसबा येथे येण्यासाठी नियमित व उपलब्ध असतात जवळचे रेल्...