संसारे कुलस्वामी श्री टोळभैरव
श्री टोळभैरव देवस्थान सुतारवाडी संगमेश्वर हे संसारे कुटुंबीयांचे कुलदैवत असून त्यांचे मूळ मंदिर श्री तुळजापूर येथे आहे. प्राचीन काळापासून संगमेश्वर जवळील सुतारवाडी कसबा येथे श्री टोळभैरव यांचे मंदिर घुमटीच्या स्वरूपात अस्तित्वात होते. संगमेश्वर आणि जवळपासच्या गावातील संसारे कुटुंबीयांनी एकत्रित येऊन त्याचा जीर्णोद्धार केला आणि नव्या स्वरूपातील सुंदर मंदिर उभारले.
या मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दिवाळी या दिवशी श्री देव टोळ भैरव यांचा उत्सव साजरा केला जातो त्या दिवशी शोडशोपचारे पूजा, अभिषेक ,होम हवन, भजन, कीर्तन ,महाप्रसाद इत्यादी द्वारे साजरा केला जातो यावेळी मुंबई रत्नागिरी चिपळूण राजापूर कोल्हापूर संगमेश्वर या ठिकाणी असलेले संसारे कुटुंबीय आवर्जून उपस्थित राहतात.
श्री टोळभैरव देवस्थान पासून जवळच श्री कुंभकेश्वर श्री कर्णेश्वर श्री काळभैरव व इतरही अनेक पुरातन मंदिरे आहेत. श्री संभाजी महाराज यांचे स्मारक सुद्धा पाहण्यासारखे आहे.
मंदिरात येण्यासाठी जवळचे बस स्थानक संगमेश्वर बस स्थानक असून तेथून कसबा येथे येण्यासाठी नियमित व उपलब्ध असतात जवळचे रेल्वे स्थानक संगमेश्वर रोड असून तेथून रिक्षा द्वारे आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो.
मंदिरात कायमस्वरूपी पुजारी यांची नेमणूक करण्यात आली असून ते दर सोमवारी श्रीटोळ भैरवाची पूजा करतात.
श्री टोळभैरव देवस्थानाबद्दल अधिक माहिती देणगी यासाठी संपर्क 1)श्री उदय संसारे संगमेश्वर -9112644432
2) श्री संजय संसारे संगमेश्वर-9423296799
3) श्री हैबतराव गुरव पुजारी-9049704031



Comments
Post a Comment