संसारे कुलस्वामी श्री टोळभैरव मंदिरात देव दिवाळी उत्सव साजरा

 


श्री टोळभैरव देवस्थान सुतारवाडी कसबा संगमेश्वर येथे दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी देव दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी दहा वाजता गणेश पूजन व श्री टोळभैरव यांच्या मूर्तीवर अभिषेक, शोडषोपचार पूजा करण्यात आली. पूजा आणि अभिषेक श्री ओंकार स्वामी जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिकेत आणि सौ अमृता संसारे जयगड यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी दीड वाजता श्री देव टोळभैरव यांना नैवेद्य दाखवण्यात आला आणि महाआरती करण्यात आली यावेळी नागेश्वर भजनी मंडळ कुंभारवाडी यांनी सुश्राव्य भजन सादर केले.

विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी मंदिर सजवण्यात आले होते सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराची उत्तम प्रकारे रंगरंगोटी करण्यात आली होती. मंदिर परिसर वर मंदिराकडे येणाऱ्या मार्गाची साफसफाई करण्यात आली होती व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गामध्ये फलक लावून नवीन येणाऱ्या भक्तांची सोय करण्यात आली होती.

यावर्षीचा महाप्रसाद सौ पद्मा प्रमोद संसारे चिपळूण यांनी श्री चरणी अर्पण केला होता त्याचे सर्व भक्तांना वाटप करण्यात आले. संगमेश्वर चिपळूण रत्नागिरी शृंगारतळी राजापूर मुंबई जयगड खंडाळा येथील संसारे कुटुंबीय आणि कसबा सुतारवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

या उत्सवाचे निमित्त साधून संसारे कुटुंबायातील विविध मान्यवर व्यापारी ,समाजसेवक ,सेवानिवृत्त, शासन पुरस्कार प्राप्त व्यक्ती,उच्चशिक्षित विद्यार्थी, मंदिराला विविध देणगी देणारे देणगीदार, मंदिराची व्यवस्था पाहणारे गुरव आणि पुजारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

खालील मान्यवरांचा श्रीदेव काळभैरव देवस्थान मार्फत सत्कार करण्यात आला

1 )ओमकार संसारे तळी (यशस्वी उद्योजक )

2) श्री मोहन शेठ संसारे (सामाजिक पुरस्कार प्राप्त यशस्वी उद्योजक/ देणगी)

3)डॉक्टर संकेत संसारे खंडाळा (देणगी)

4) श्री वैभव संसारे आणि बंधू चिपळूण (मंदिरासाठी लादी )

5)श्री सुधाकर बोंडकर (मंदिराचे काम)

6) श्री शशिकांत हैबतराव (मंदिर व्यवस्था)

7) श्री विजय गुरव (मंदिर व्यवस्था पूजा )

8)कु.शमिका संसारे  CA

9)कु रिद्धी दीपक संसारे.MS Canada

10) श्री अनिकेत शरद संसारे (महाप्रसादाची भांडी )

11)श्री सुदीप संसारे शृंगारतळी (यशस्वी उद्योजक)

12) सौ पद्मा प्रमोद संसारे (2023महाप्रसाद)

13) कु तेजस संसारे रत्नागिरी (BE)

14) कु श्रीयश संसारे. मुंबई (BE)

15) श्री प्रसाद रवींद्र संसारे शृंगारतळी (यशस्वी उद्योजक/ देणगी)

या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री उदय संसारे श्री संजय संसारे श्री अशोक संसारे श्री विजय गुरव श्री शशिकांत हैबतराव संसारी कुटुंबीय संगमेश्वर आणि सुतारवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले.




.
















Comments

Popular posts from this blog

संसारे कुलस्वामी श्री टोळभैरव